विनम्र आवाहन...

"प्रिय साहित्यरसिकहो, ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कार्य करण्याची संधी आपणा सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वादामुळे मला लाभते आहे. या अध्यक्षीय कालावधीमध्ये मराठी भाषा, संस्कृतीचे रक्षण, संवर्धन करण्याच्या दृष्टीने विविध संकल्पना, उपक्रम राबविण्याचा माझा मानस आहे. आपणा सर्वांच्या सहभाग व सहकार्यातूनच हे कार्य पुढे जाऊ शकते. यासाठी, आपल्या मनात काही कल्पना असतील, त्या जरुर कळवाव्यात. विधायक, वेगळ्या आणि विषयाशी सुसंगत अशा उपक्रमांचा जरुर विचार केला जाईल. साहित्यबाह्य अथवा हेतूविसंगत, अप्रस्तुत सूचनांचा विचार करता येणार नाही. संमेलनाध्यक्ष हे मानाचे पद असले तरी सर्वांच्या सहभागातून त्यास कार्याची जोड देता येऊ शकते आणि मायमराठीसाठी दिशादर्शी आणि भरीव असे काही त्यातून नक्कीच करु शकू, याची मला खात्री आहे. आपणास सूचना खालील ई-मेल वर पाठविता येतील."

आपला स्नेहांकित,
लक्ष्मीकांत देशमुख
ई-मेल - laxmikant05@yahoo.co.in

संग्रह

#
#
#
#
#

"लेखक व कलावंत हा साहित्याने जग कदाचित बदलू शकत नाही. पण उद्याचे बदलणारे जग कसे असावे / कसे असू नये, त्याची चिंतन व अनुभवाच्या आधारे त्याची निश्चितच निलप्रत-ब्लूप्रिंट मांडू शकतो. मी हे जग बालमजूर मुक्त व्हावे व स्त्रीभूण-हत्या थांबून संख्येने तरी स्त्री-पुरुष प्रमाण समान व्हावे, भ्रष्टाचार मुक्त प्रशासन असावे हे कलात्मक रितीने मी माझ्या लेखनातून मांडून उच्चतर लेखकीय नैतिक कर्तव्याचे पालन केले आहे. हे मी आपल्या सजग नजरेस आणून देऊ इच्छितो. लेखक व कलावंताने केवळ लेखन करून थांबायचे नसते तर आपल्या नैतिक भूमिका व मनाशी बाळगलेल्या मूल्यांसाठी जमेल तेवढे प्रत्यक्ष कामही करणे हे त्याचे उत्तर दायित्व आहे असे मानणारा मी लेखक आहे."

साहित्य सेवा

कादंबरी
कथासंग्रह
नाटके/बालनाटक
ललितेतर साहित्य

पुरस्कार

महाराष्ट्र साहित्य परिषद
मराठवाडा साहित्य परिषद
सामाजिक प्रशासकीय पुरस्कार
संमेलन अध्यक्षपदे

माध्यमांत

संस्मरणीय