विनम्र आवाहन...

"प्रिय साहित्यरसिकहो, ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कार्य करण्याची संधी आपणा सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वादामुळे मला लाभते आहे. या अध्यक्षीय कालावधीमध्ये मराठी भाषा, संस्कृतीचे रक्षण, संवर्धन करण्याच्या दृष्टीने विविध संकल्पना, उपक्रम राबविण्याचा माझा मानस आहे. आपणा सर्वांच्या सहभाग व सहकार्यातूनच हे कार्य पुढे जाऊ शकते. यासाठी, आपल्या मनात काही कल्पना असतील, त्या जरुर कळवाव्यात. विधायक, वेगळ्या आणि विषयाशी सुसंगत अशा उपक्रमांचा जरुर विचार केला जाईल. साहित्यबाह्य अथवा हेतूविसंगत, अप्रस्तुत सूचनांचा विचार करता येणार नाही. संमेलनाध्यक्ष हे मानाचे पद असले तरी सर्वांच्या सहभागातून त्यास कार्याची जोड देता येऊ शकते आणि मायमराठीसाठी दिशादर्शी आणि भरीव असे काही त्यातून नक्कीच करु शकू, याची मला खात्री आहे. आपणास सूचना खालील ई-मेल वर पाठविता येतील."

आपला स्नेहांकित,
लक्ष्मीकांत देशमुख
ई-मेल - laxmikant05@yahoo.co.in

संग्रह

#
#
#
#
#

प्रकाशित साहित्य

कादंबरी

 • 1. सलोमी (दोन लघु कादंब-या)
 • 2. होते कुरूप वेडे
 • 3. अंधेरनगरी
 • 4. ऑक्टोपस
 • 5. इन्किलाब विरुद्ध जिहाद
 • 6. हरवलेले बालपण

कथासंग्रह

 • 1. कथांजली
 • 2. अंतरीच्या गूढगर्भी
 • 3. पाणी! पाणी!!
 • 4. नंबर वन
 • 5. सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी
 • 6. अग्नीपथ
 • 7. मृगतृष्णा

नाटके/बालनाटक

 • 1. अखेरची रात्र
 • 2. दूरदर्शन हाजिर हो...!

ललितेतर साहित्य

 • 1. प्रशासननामा (प्रशासकीय कथालेख)
 • 2. बखर भारतीय प्रशासनाची (भारतीय प्रशासनावरील ग्रंथ)
 • 3. अविस्मरणीय कोल्हापूर (कॉफी टेबलबुक)
 • 4. मधुबाला ते गांधी (ललित लेखसंग्रह)

संपादित

 • 1. लक्षदीप (लक्ष्मीकांत देशमुख यांचे निवडक साहित्य) संपादक : डॉ. रणधीर शिंदे
 • 2. अन्वयार्थ (लक्ष्मीकांत देशमुख यांच्या साहित्याची समग्र समीक्षा) संपादक : डॉ. रणधीर शिंदे
 • 3. मराठवाडा मुक्तीसंग्राम (सहलेखक वि. ल. धारूरकर)

इंग्रजी साहित्य

 • 1. The Real Hero and Other Stories (Short story collection)
 • 2. Administration : Good to Greatness
 • 3. Charismatic Kolhapur

हिंदी साहित्य

 • 1. खोया हुआ बचपन (प्रकाशनाच्या मार्गावर)