विनम्र आवाहन...

"प्रिय साहित्यरसिकहो, ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कार्य करण्याची संधी आपणा सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वादामुळे मला लाभते आहे. या अध्यक्षीय कालावधीमध्ये मराठी भाषा, संस्कृतीचे रक्षण, संवर्धन करण्याच्या दृष्टीने विविध संकल्पना, उपक्रम राबविण्याचा माझा मानस आहे. आपणा सर्वांच्या सहभाग व सहकार्यातूनच हे कार्य पुढे जाऊ शकते. यासाठी, आपल्या मनात काही कल्पना असतील, त्या जरुर कळवाव्यात. विधायक, वेगळ्या आणि विषयाशी सुसंगत अशा उपक्रमांचा जरुर विचार केला जाईल. साहित्यबाह्य अथवा हेतूविसंगत, अप्रस्तुत सूचनांचा विचार करता येणार नाही. संमेलनाध्यक्ष हे मानाचे पद असले तरी सर्वांच्या सहभागातून त्यास कार्याची जोड देता येऊ शकते आणि मायमराठीसाठी दिशादर्शी आणि भरीव असे काही त्यातून नक्कीच करु शकू, याची मला खात्री आहे. आपणास सूचना खालील ई-मेल वर पाठविता येतील."

आपला स्नेहांकित,
लक्ष्मीकांत देशमुख
ई-मेल - laxmikant05@yahoo.co.in

संग्रह

#
#
#
#
#

परिचय


नाव: लक्ष्मीकांत देशमुख
जन्म: 5 सप्टेंबर 1954
गाव: मूळगाव - मुरूम, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद
पत्ता: श्री निवास गार्डन, बी/२, केदारनाथ मंदिराजवळ, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर, पुणे - ४११ ०१६.

शिक्षण :
एम. एस्सी. केमेस्ट्री - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद,एम. ए. मराठी साहित्य - शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर.एम. बी. ए. पब्लिक पॉलिसी - आय. आय. एम. बेंगलोर, (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बंगलोर) सर्टिफिकेट कोर्स इन इंटरनॅशनल पॉलिसी-सिरॅक्युस युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्क, अमेरिका

करियर :
निवृत्त आय. ए. एस. अधिकारी
माजी जिल्हाधिकारी, कोल्हापूर
माजी एम. डी. फिल्मसिटी, गोरेगाव, मुंबई
सध्या शैक्षणिक सल्लागार - यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ,
नाशिक आणि विश्वस्त - श्री ज्ञानेश्वर संस्थान समिती आळंदी.
मोबाईल नंबर - +९१ ९३२५ २९७५०९
ई-मेल - laxmikant05@yahoo.co.in