विनम्र आवाहन...

"प्रिय साहित्यरसिकहो, ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कार्य करण्याची संधी आपणा सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वादामुळे मला लाभते आहे. या अध्यक्षीय कालावधीमध्ये मराठी भाषा, संस्कृतीचे रक्षण, संवर्धन करण्याच्या दृष्टीने विविध संकल्पना, उपक्रम राबविण्याचा माझा मानस आहे. आपणा सर्वांच्या सहभाग व सहकार्यातूनच हे कार्य पुढे जाऊ शकते. यासाठी, आपल्या मनात काही कल्पना असतील, त्या जरुर कळवाव्यात. विधायक, वेगळ्या आणि विषयाशी सुसंगत अशा उपक्रमांचा जरुर विचार केला जाईल. साहित्यबाह्य अथवा हेतूविसंगत, अप्रस्तुत सूचनांचा विचार करता येणार नाही. संमेलनाध्यक्ष हे मानाचे पद असले तरी सर्वांच्या सहभागातून त्यास कार्याची जोड देता येऊ शकते आणि मायमराठीसाठी दिशादर्शी आणि भरीव असे काही त्यातून नक्कीच करु शकू, याची मला खात्री आहे. आपणास सूचना खालील ई-मेल वर पाठविता येतील."

आपला स्नेहांकित,
लक्ष्मीकांत देशमुख
ई-मेल - laxmikant05@yahoo.co.in

संग्रह

#
#
#
#
#

मी गाव शिवार व सामान्य माणसांचा संघर्ष चितरणारे साहित्य (पाणी! पाणी!!, अग्निपथ व मृगतृष्णा’ सारखे कथासंग्रह) जसे लिहिले आहे तसेच जागतिक दहशतवादावरची मराठीतली पहिली खरीखुरी आंतरराष्ट्रीय कादंबरी (हे दोन माझी संमेलनाध्यक्ष सर्वश्री सदानंद मोरे व अरूण साधूंनी म्हणले आहे.) लिहिली आहे. आज आपल्या देशाचे काही महत्त्वाचे प्रश्न म्हणजे बालमजुरी, स्त्रीभ्रूण-हत्या व भ्रष्टाचार यावर अनुक्रमे मी ‘‘हरवलेले बालपण” (कादंबरी), ‘‘सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी” (कथासंग्रह) आणि ‘ऑक्टोपस” (कादंबरी) ही पुस्तके लिहिली आहेत. भारतीय प्रशासन, नोकरशाही आणि राजकारण यावर ‘बखर भारतीय प्रशासनाची’, ‘प्रशासनामा’ व “अंधेरी नगरी” ही पुस्तके लिहिली आहेत. मराठी साहित्यात प्रशासन व अनुषंगिक राजकारण हा विषय कदाचित प्रथमच आला आहे. तसेच मलाही नम्रपणे, स्पष्टपणे सांगू द्या की, केवळ मराठीतच नव्हे तर पूर्ण भारतात प्रथमच क्रीडा जगत, खेळाडूंचे जीवन आणि त्यांच्यातील माणसाचा शोध घेणाच्या क्रीडा कथांचा मी नंबर 1’ हा कथासंग्रह लिहिला, ज्यावर सचिन तेंडुलकर, धनराज पिल्ले आणि प्रकाश पदुकोण यांनी पसंती दर्शक अभिप्राय दिले आहेत म्हणून मी स्वत:ला एका अर्थाने ‘ग्लोकल म्हणजेच ‘ग्लोबल अधिक लोकल बरोबर ग्लोकल’ अशी माझ्या साहित्याची, गाव ते जग अशी रेंज असणारा लेखक मानतो. ही वस्तुस्थिती आहे. आणि हे रसिक म्हणून सहमत व्हाल!

लेखक व कलावंत हा साहित्याने जग कदाचित बदलू शकत नाही. पण उद्याचे बदलणारे जग कसे असावे / कसे असू नये, त्याची चिंतन व अनुभवाच्या आधारे त्याची निश्चितच निलप्रत-ब्लूप्रिंट मांडू शकतो. मी हे जग बालमजूर मुक्त व्हावे व स्त्रीभूण-हत्या थांबून संख्येने तरी स्त्री-पुरुष प्रमाण समान व्हावे, भ्रष्टाचार मुक्त प्रशासन असावे हे कलात्मक रितीने मी माझ्या लेखनातून मांडून उच्चतर लेखकीय नैतिक कर्तव्याचे पालन केले आहे. हे मी आपल्या सजग नजरेस आणून देऊ इच्छितो. लेखक व कलावंताने केवळ लेखन करून थांबायचे नसते तर आपल्या नैतिक भूमिका व मनाशी बाळगलेल्या मूल्यांसाठी जमेल तेवढे प्रत्यक्ष कामही करणे हे त्याचे उत्तर दायित्व आहे असे मानणारा मी लेखक आहे. हे भारतातील 1949 च्या काळातील प्रगतीशील लेखक चळवळीचे नेतृत्व करणारे श्रेष्ठ लेखक मुन्शी प्रेमचंद, रवींद्रनाथ ठागोर, कवी साहिर लुधियानवी, कैफी आजमी, भिष्म सहानी, अण्णाभाऊ साठे व शाहीर अमर शेख सारख्यांनी लेखनासोबत प्रत्यक्ष चळवळी केल्या व आपल्या ध्येय-मूल्यांसाठी संघर्ष केला, त्यांची ही भूमिका मी मनापासून मानतो व आजवर तिचे मी कृतीशील पालन केले आहे. मी उपजीविकेसाठी प्रशासन सेवा केली. पण ती एक ध्येय बाळगून, ते म्हणजे विकासाची फळे गरीब लोकांपर्यंत पोचवावीत तसेच भारतीय संविधानाची उदात्त मूल्य, कला व संस्कृतीच्या माध्यमातून नागरिकामध्ये रुजवावीत. यासाठी मी काही महत्त्वाचे उपक्रम प्रत्यक्ष स्वतः राबवले आहेत.

माझे लेखकीय नैतिक कर्तव्य म्हणून परभणी-मराठवाड्याचे थोर कवी- कथाकार बी. रघुनाथाचे, पुढाकार घेत लोक व शासन सहभाग मिळवून 1999 मध्ये स्मारक बांधले, तर कोल्हापूरला जिल्हाधिकारी व पदसिद्ध अध्यक्ष म्हणून राजर्षी शाहू स्मारकाचे नूतनीकरण व विस्तारीकरण करून नवे कला दालन, तीन मजली भव्य लायब्ररी व एक नवे सभागृह बांधले. मुख्य म्हणजे तेथे शाहू महाराजांचे जीवन कार्य दाखवणारे देखणे शिल्पचित्र उभारले. आज हे शाहू स्मारक कोल्हापूरचे सांस्कृतिक उपक्रमाचे प्रमुख केंद्र बनले आहे. हे करून मी क्रियाशील लेखकाचे कर्तव्य पार पाडले आहे अशी माझी नम्र भावना आहे.

उद्याचे जग हे माणुसकी, सहजीवन आणि परस्पर प्रेम-विश्वास यावर आधारित असावे व विश्वबंधुत्व, करुणा आणि सहअनुभूतीयुक्त असावे हा विचार संत ज्ञानेश्वर यांनी ‘पसायदान” मधून मांडला व तो एकूणच संत साहित्याचा मूल्य विचार आहे म्हणून श्री ज्ञानेश्वर संस्थांन आळंदी समितीचा विश्वस्त म्हणून गेले वर्षभर कल्पना मांडून व नीट आखणी करून जीवनात पसायदानाचे वैश्विक मूल्ये रुजवावीत, निदान ती नव्या पिढीपर्यंत आजच्या भाषेत न्यावीत म्हणून मी इतर विश्वस्तांच्या मदतीने 15 ते 17 डिसेंबर दरम्यान आळंदी येथे पहिले पसायदान विचार साहित्य संमेलन” मी आयोजित केले आहे व त्याची पूर्वीच वार्ताहार परिषद घेऊन उद्धोषणा केली आहे. हे ही उद्याचे जग कसे असावे हे सांगण्याचा एक प्रयत्न आहे व लेखक म्हणून माझे नैतिक कर्तव्य!