विनम्र आवाहन...

"प्रिय साहित्यरसिकहो, ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कार्य करण्याची संधी आपणा सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वादामुळे मला लाभते आहे. या अध्यक्षीय कालावधीमध्ये मराठी भाषा, संस्कृतीचे रक्षण, संवर्धन करण्याच्या दृष्टीने विविध संकल्पना, उपक्रम राबविण्याचा माझा मानस आहे. आपणा सर्वांच्या सहभाग व सहकार्यातूनच हे कार्य पुढे जाऊ शकते. यासाठी, आपल्या मनात काही कल्पना असतील, त्या जरुर कळवाव्यात. विधायक, वेगळ्या आणि विषयाशी सुसंगत अशा उपक्रमांचा जरुर विचार केला जाईल. साहित्यबाह्य अथवा हेतूविसंगत, अप्रस्तुत सूचनांचा विचार करता येणार नाही. संमेलनाध्यक्ष हे मानाचे पद असले तरी सर्वांच्या सहभागातून त्यास कार्याची जोड देता येऊ शकते आणि मायमराठीसाठी दिशादर्शी आणि भरीव असे काही त्यातून नक्कीच करु शकू, याची मला खात्री आहे. आपणास सूचना खालील ई-मेल वर पाठविता येतील."

आपला स्नेहांकित,
लक्ष्मीकांत देशमुख
ई-मेल - laxmikant05@yahoo.co.in

संग्रह

#
#
#
#
#

पुरस्कार

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे

 • 1. इन्किलाब विरुद्ध जिहाद (ग. ह. खरे पुरस्कार)
 • 2. पाणी! पाणी!! (ग. ल. ठोकळ पुरस्कार)
 • 3. हरवलेले बालपण (माडगूळकर पुरस्कार)

मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद

 • 1. पाणी! पाणी!!
 • 2. सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी

अन्य वाङ्‌मय संस्थांचे पुरस्कार

 • 1. वाङ्‌मय चर्चा बेळगाव - इन्किलाब विरुद्ध जिहाद
 • 2. प्रसाद बन पुरस्कार - इन्किलाब विरुद्ध जिहाद
 • 3. नगर वाचनालय, नगर - इन्किलाब विरुद्ध जिहाद
 • 4. आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी - इन्किलाब विरुद्ध जिहाद
 • 5. म.सा.प. शाखा बार्शी (शाहीर अमर शेख पुरस्कार) - ऑक्टोपस
 • 6. साहित्य दीप पुणे पुरस्कार - एकूण वाङ्‌मय सेवा
 • 7. प्रेरणा आर्ट फाऊंडेशन पुणे, कलागौरव पुरस्कार - एकूण वाङ्मय सेवा.

सामाजिक प्रशासकीय पुरस्कार

 • 1. महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार - स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी
 • 2. नॅसकॉम सोशल इंपॅक्ट अॅवॉर्ड-सेव्ह द बेबी गर्ल या स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी केलेला आय. टी. साठी राष्ट्रीय पुरस्कार
 • 3. टाईम्स ऑफ इंडिया सोशल ऑनर अॅवॉर्ड - सेव्ह द बेबी गर्लसाठी मा. पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार
 • 4. महाराष्ट्र शासन - आदर्श जिल्हाधिकारी पुरस्कार

संमेलन अध्यक्षपदे

 • 1. दुसरे शासकीय कर्मचारी साहित्य संमेलन, पुणे 2010
 • 2. तिसरे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन, नागपूर 2011
 • 3. पहिले डोंगरगाव, जि. सांगली लोकजागर साहित्य संमेलन, 2015
 • 4. 38 वे मराठवाडा साहित्य संमेलन नांदेड, फेब्रुवारी 2015

इतर कार्ये

 • 1. 1995 चे 68 वे अ. भा. सा. संमेलन, परभणी - कार्याध्यक्ष
 • 2. ‘अक्षर प्रतिष्ठा’ वाङ्‌मयीन वार्षिक दिवाळी अंक - संपादक
 • 3. ‘अक्षरअयान’ पुण्याहून प्रकाशित होणारा दिवाळी अंक- संपादक